Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 4 हजार 654 घरांच्या सोडतीमधील ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेतील 2 हजार 48 घरांसाठी आजपासून अनामत रकमेसह अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. (Mhada Home Lottery 2023 ) विरार- बोळींजमधील या दोन हजार 48 घरांची काही कारणांमुळे विक्री होऊ शकलेली नाही. त्यामुळे या घरांचा ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेत समावेश करण्यात आला आहे.( Konkan Mhada Lottery 2023 ) अनामत रक्कमेसह सर्वप्रथम अर्ज सादर करणाऱ्या पात्र अर्जदाराला घर वितरित करण्यात येणार आहे. ( Konkan Mhada Lottery 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार-बोळीज प्रकल्पातील दोन हजार 48 घरांसाठी तीन वेळा सोडत काढण्यात आली होती. मात्र काहीही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता नवा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जो प्रथम येईल, त्याला घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अंदाजे 20 ते 25 लाख इतकी किंमत या घरांची आहे. या योजनेसाठीच्या अर्ज विक्री- स्वीकृतीसाठी कमी कालावधी देण्यात आला आहे. या योजनेतील घरासाठी 12 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. तर 10 मे रोजी यशस्वी अर्जदारांची यादी जाहीर होणार आहे. 


मुंबईत म्हाडाची महागडी घरे


दरम्यान, आगामी Mhada Lottery त काही महागड्या घरांचा समावेश आहे. ही घरे कोण घेणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. कारण म्हाडाची घरेही सर्वसामान्यांसाठी परवडणार असतात. मात्र, या घरांच्या किमती पाहिल्या तर सामान्य लोक ही घरे घेण्यापासून लांब राहतील. कारण यांची किंमत कोटीच्या घरात आहेत. सध्या सोडतीमध्ये असणारी संभाव्य घरं ही मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी असून, यातील 101 घरांपैकी 54 घरं अंधेरीमध्ये आहेत. तर, म्हाडाच्याच जुहू विक्रांत प्रकल्पात असणाऱ्या घरांची किंमत 4 कोटी 38 लाख रुपये असल्याची माहिती समोर येत आहे.  4 कोटी ही सर्वाधिक किंमत असून, त्याखालोखाल काही घरांच्या किमती 3 कोटी 81 लाख रुपये आहेत.   


तर उदयाभवन सहकार नगर येथे असणाऱ्या अल्प गटासाठीच्या 7 घरांची किंमत प्रत्येकी 40 लाख रुपये इतकी आहे. तर, कांदिवलीमधील सेक्टर 5 मध्ये म्हाडाची मध्यम गटासाठीची 3 घरं प्रत्येकी 60 लाख रुपयांना उपलब्ध असतील. तर अंधेरीतील आयडियल अपार्टमेंटमध्ये मध्यम गटासाठी असणाऱ्या 13 घरांची किंमत अंदाजे 2 कोटी 41 लाख रुपये सांगण्यात येत आहे. तर अंधेरीतील मानस प्रकल्पातील मध्यम गटासाठी असणाऱ्या एका घराची किंमत 1 कोटी 43 लाख रुपये इतकी असेल. 


अंधेरीतील निर्यानंद नगर येथे म्हाडाची 11 घरं उपलब्ध असल्याचं कळत आहे. मध्यम गटासाठी असणाऱ्या या घराच्या किमती 1 कोटी 34 लाख ते 1 कोटी 64 लाख रुपये इतक्या आहेत.  तसेच पंतनगर घाटकोपर येथे म्हाडाची अल्प गटासाठीची 31 घरं असून, त्यांची किंमत 81 ते 82 लाखांच्या दरम्यान असू शकते.