दीपाली जगताप-पाटील, झी २४ तास, मुंबई : मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाने प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीच्या प्रक्रियेला २९ मे २०१९ पासून सुरुवात केलीय. गेल्या दोन दिवसांत २८ हजार १८१ विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या नोंदणी केली असून त्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी ३३ हजार ९४४ एवढे अर्ज दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीच्या प्रक्रियेसाठी ४ लाख ५६ हजार ६५४ एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी ११ लाख ५ हजार ५५० एवढे अर्ज केले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी मुंबई विद्यापीठातर्फे प्रथमवर्ष बी. ए, बी. एस्सी, बी. कॉम, बी. एमएमएम, बी. एसडब्ल्यू, बीए (फ्रेंच स्टडी), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए (इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडी), बीएमएस, बीएमएस-एमबीए (पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) , बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम (अकीफन्टींग एन्ड फायनान्स), बीकॉम (बँकिंग अँड इन्शुअरन्स), बीकॉम (फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम (इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम (ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीएस्सी (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (कम्प्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पीटॅलिटी स्टडी), बीएस्सी (मायक्रोबायोलॉजी), बीएस्सी (बायो-केमेस्ट्री), अशा अनेक कोर्ससाठी विद्यार्थी अर्ज करत आहेत. 

'मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात विविध पारंपारिक अभ्यासक्रमांसोबत अनेक नाविण्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक अभ्यासक्रम, विषय आणि महाविद्यालयाची निवड करुन प्रवेश घ्यावा', असं आवाहन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुहास पेडणेकर यांनी केलंय.