अरुण मेहेत्रे / देवेंद्र कोल्हटकर / मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना नवी मुंबईतील वाशी न्यायालयाने (Vashi court) १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केलाय. २०१४ मध्ये वाशी टोल नाका (Vashi Toll Plaza) तोडफोड प्रकरणी राज ठाकरे कोर्टात हजर झाले होते. आजच्या या कोर्टवारीतून राज ठाकरे यांनी नेमकं काय साधले आहे. 


शेतकरी आंदोलन :  'चर्चा करुन कायदा करायला हवा होता'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठिकाण कृष्णकुंज. मनसे प्रमुख राज ठाकरे वाशी कोर्टात जायला निघाले. कृष्णकुंजवर मनसैनिकांची गर्दी. राज ठाकरे कोर्टात पोहोचले. कोर्टाबाहेर मनसैनिकांची गर्दी. बेलापूरमध्ये मनसे शाखेचं उद्घाटन केलं. तिथंही कार्यकर्त्यांची गर्दी. येतायेता राज ठाकरे ठाण्यात थांबले. तिथं तुडुंब मनसैनिक. घोषणाबाजी.



एकंदरीत काय तर राज ठाकरे कोर्टात हजेरी लावालयला निघाले. आणि त्यानिमित्तानं मनसेनं शक्तिप्रदर्शन केलं. मोठी गर्दी,गाड्यांचा ताफा आणि घोषणाबाजी...नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. या शक्तिप्रदर्शनानं मनसेमध्ये जोश आणण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केला. सध्या नवी मुंबई महानगरपालिकेत मनसेची पाटी कोरी आहे. मात्र यावेळी चांगलं यश मिळेल, अशी मनसेला आशा आहे.


पुण्यात २०२२ मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका असल्या तरी राज ठाकरेंचे पुणे दौरे वाढलेत. सध्या पुणे महापालिकेत मनसेचे फक्त 2 नगरसेवक आहेत. कोर्टात राज ठाकरेंना बोलावण्यात आलं होतं, ते चिथावणीखोर भाषणाप्रकरणी. त्यानिमित्तानं आज कोर्टात हजेरी पण झाली, शक्तिप्रदर्शनही झालं आणि प्रचारही.