मुंबई : मनसे उद्याच्या आंदोलनावर ठाम आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषेत पत्रक काढून मनसे आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देशभरातील हिंदू बांधव आणि महाराष्ट्रातील मनसे कार्यकर्ते यांना संबोधित करणार असल्याची माहिती मिळतेय. उद्यापासून मशिदीवरील भोंगे काढले नाहीत तर मशिदींसमोर हनुमान चालिसा दुप्पट आवाजात वाजवण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे, आंदोलनापूर्वी मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. औरंगबादमधले मनसे जिल्हाध्यक्षांचा घरी जाऊन पोलिसांनी त्यांना नोटीस दिली आहे. ही कारवाई चुकीची असून दडपशाही सुरु असल्याचं मनसे जिल्हाध्यक्षांनी म्हटलं आहे. राज ठाकरे सुप्रीम कोर्टाच्या नियमांना अनुसरून बोलतायत तो आवाज दडपण्यासाठी आज सकाळपासून मनसेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला नोटीस बजावण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. औरंगाबादमध्ये मनसेच्या 40 पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.


गृहविभाग अॅक्शनमोडमध्ये
राज्यात कायदा सुव्यवस्था नीट राहावी यासाठी कठोर पावलं उचला, असे आदेश गृहमंत्र्यांनी पोलिसांना दिलेत. जे कायदा सुव्यवस्था बिघडवतील, त्यांना ताब्यात घेतलं जाईल, तसंच तेढ पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेत. गृहमंत्र्यांनी राज्यातल्या पोलिसांची बैठक घेतली. त्यामध्ये पोलिसांनी हे आदेश देण्यात आलेत.


राज ठाकरे यांच्या भाषणाबाबत कारवाई होणार
राज ठाकरे यांचं भाषण औरंगाबाद पोलिसांनी अभ्यासलं आहे, मुंबई पोलिसांना आवश्यक वाटल्यास पोलीस योग्य ती कारवाई करतील असं मुंबईचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी म्हटलंय. राज यांच्यावर आजच कारवाई होण्याची शक्यता आहे.  कायदा सुव्यवस्था बिघडवल्यास कठोर कारवाई होईल असं डीजीपींनी म्हटलंय.