वसई : वसईतही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गायक मिका सिंग याचा पुतळा जाळलाय. मिका सिंग पाकिस्तानच्या स्वतंत्र दिनाच्या कार्यक्रमात गाणार आहें. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिका सिंग ला पाकिस्तान चा एवढा पुळका का? असा सवाल मनसेनं उपस्थित केला आहें. वसईच्या नवघर बस डेपोपासून मिका सिंगच्या पुतळयाची धिंड काढ़ून त्याचा पुतळा जाळला. मिका सिंग याला भारतात येऊ देणार नाहीं. असा इशाराही यावेळी देण्यात आलाय..


भारत आणि पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी मिका सिंग अमेरिकेत १२ आणि १३ ऑगस्टला गाण्यांचा कार्यक्रम करणार आहे. त्याच्या प्रमोशनसाठी मिकानं जाहीर केलेल्या एका व्हिडिओमध्ये 'हमारा पाकिस्तान' असा उल्लेख केल्यानं आक्षेप घेतला जातोय.