देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : 23 ऑक्टोबरला भांडूपमध्ये मनसेचा मेळावा होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार असून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसेने 'गर्व से कहो हम हिंदू है' चा नारा नुकताच दिला आहे. उत्तरप्रदेशातील साधू महंतांनी कृष्णकुंज वर राज ठाकरे यांची हिंदू राष्ट्राच्या बांधणीसाठी भेट घेतली होती. हिंदुत्ववाची मनसेची भूमिका दिवसेंदिवस गडद होतेय. तसेच डिसेंबरमध्ये राज ठाकरे हे अयोध्येला जाणार आहेत. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरे हे काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.


भाजप आणि मनसे युतीची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे युतीच्या मुद्द्यावर राज ठाकरे भाष्य करणार का ? याकडे ही महाराष्ट्राला लक्ष लागलं आहे.


याआधी राज ठाकरे यांनी पुणे दौरे केले आहेत. पुणे महापालिकेची निवडणूक देखील जवळ आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे आता सर्वांच लक्ष लागून आहे.