मुंबई : भारत-जपान मैत्रीच्या पर्वाचा नवा अध्याय गुजरातच्या साबरमतीमधल्या स्टेडियममध्ये लिहिला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचं भूमीपूजन केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, या प्रकल्पावर मनसेने जोरदार टीका केलीये. मुंबईचं आर्थिकदृष्ट्या महत्त्व कमी करण्यासाठी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचा प्रकल्प उभारला जात असल्याची टीका मनसेनं केलीय. गुजरातच्या 'गिफ्ट' सिटीसाठी मुंबईतल्या आरक्षित जागेचा बळी देण्यात येत असल्याचा आरोपही मनसेनं केलाय.  


जपानकडून मिळणारं ८८ हजार कोटी रुपयांच्या कर्ज आणि तांत्रिक सहाय्य याच्या जोरावर स्वातंत्र्यानंतर प्रथमच बुलेट ट्रेनच्या रुपाने जलदगती रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार आहे.