मनसेचा पुन्हा मराठी मुद्दा, अॅमेझॉन व्यवस्थापनाच्या विरोधात आक्रमक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठीचा मुद्दा पुन्हा घेतला आहे. आता मनसेनेने ई-कॉमर्स कंपनीकडे वळवला आहे.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठीचा मुद्दा पुन्हा घेतला आहे. आता मनसेनेने ई-कॉमर्स कंपनीकडे वळवला आहे. अॅमेझॉनने मराठीला स्थान द्यावे, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली होती. मात्र, अॅमेझॉन व्यवस्थापनने असमर्थता दर्शविल्याने आता मनसे अधिक आक्रमक झाली आहे.
अॅमेझॉन व्यवस्थापनाच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. अॅमेझॉनच्या घाटकोपर इथल्या वेअरहाऊस बाहेर मनसे कार्यकर्त्यांनी 'तुमची डिलिव्हरी, तुमची जबाबदारी, मराठी नाही तर अॅमेझॉन नाही', अशी पोस्टर लावली आहेत.
अॅमेझॉन अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश असावा, अशी मनसेची मागणी आहे. मराठी भाषेचा यात समावेश करता येणार नाही असे अॅमेझॉनकडून न्यायालयात सांगण्यात आले आहे. त्यामुळे मनसेने आक्रमक होत अॅमेझॉन विरोधात मोहीम सुरू केली आहे.