मुंबई : अनेक दिवसांपासून हुलकावणी देणारा मान्सून अखेर दाखल झाला आहे. हा मान्सून  दक्षिक कोकणमध्ये सक्रीय  झाला असून येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, अशी माहिती हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची हजेरी लावली आहे. काल रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले. पहिल्या पावसाचा फटका रत्नागित मुंबई - गोवा महामार्गाला बसला. मोरी खचल्याने मुंबई - गोवा महामार्गावरची वाहतूक खोळंबली होती.


रत्नागिरीत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वायू चक्रीवादळामुळे मान्सूनला अडथळा निर्माण झाला होता. आता वायू वादळाचे संकट दूर झाल्याने मान्सून सक्रीय झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनची प्रतीक्षा होती. १२ ते १४ जूनच्या दरम्यान मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला मात्र तोही खरा ठरला नाही.  त्यानंतर  २१जून ही तारीख जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे हा अंदाज खरा ठरला आहे. मान्सून दाखल झाल्याने येत्या दोन ते तीन दिवसात मुंबईसह महाराष्ट्रात पाऊस पडण्यास सुरूवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.



दरम्यान, दक्षिण कोकणात मान्सून दाखल झाला आहे. सुरुवातीला रत्नागिरी, कोल्हापूर या ठिकाणी पावसाचे आगमन होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रात पाऊस पडण्यास सुरूवात होईल, असे होसाळीकर यांनी म्हटले आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे आगमन झाले आहे. येत्या दोन ते तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून बसरले. त्यामुळे दुष्काळाचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे.