चिंता वाढली! प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईने दिल्लीलाही टाकलं मागे, सर्वत्र विषारी हवा
Mumbai Air Pollution : मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात धुरकट वातावरण पाहायला मिळत आहे. (Mumbai vs Delhi Air Polluted Situation) या वातावरणामुळे सर्दी, खोकल्या (Mumbai Bad Air Quality Reason for Health Issues) सारख्या आजारांनी नागरिकांना घेरलं आहे. दिल्लीने प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईलाही मागे टाकलं आहे आणि हिच मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा आहे.
Mumbai Worse Air Pollution : ऑक्टोबर हिटसोबतच मुंबईत प्रदूषण वेळेपूर्वीच कहर करत आहे. या सगळ्यांच थंडी कुठे तरी लांब गेल्याच दिसत आहे. सामान्यत: दिल्ली प्रदूषणामुळे चर्चेत राहते पण मुंबईची स्थिती आणखी त्यापेक्षाही वाईट झाली आहे. प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईने दिल्लीचा विक्रम मोडला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईची हवा दिल्लीपेक्षा विषारी आहे. वाढत्या प्रदूषणाबाबत राज्य सरकारचे मंत्री सांगतात की, सध्या सुरू असलेले प्रकल्प त्याला जबाबदार आहेत. रस्त्यापासून आकाशाकडे प्रदूषण वाढत आहे. मुंबईत पारा ३६ अंशांच्या पुढे गेला आहे. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR-इंडिया) नुसार, गुरुवारी सकाळी मुंबईत AQI पातळी 166 नोंदवली गेली, तर दिल्लीत ती 117 होती. बुधवारी संध्याकाळी 6 वाजता मुंबईच्या हवेतील PM10 पातळी 143 होते, तर दिल्लीत 122 होते.
एअर क्वालिटी होतेय खराब
तज्ज्ञांचे मत आहे की, सर्वत्र सुरू असलेले बांधकाम आणि 34 ते 36 अंशांच्या तापमानासह कडक उष्णतेमुळे आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून हवेची गुणवत्ता म्हणजेच AQI मध्यम ते खराब श्रेणीत दिसून येत आहे. या कालावधीत, मुंबई आणि आजूबाजूच्या भागात सर्वात जास्त प्रभावित भागात अंधेरी, माझगाव, नवी मुंबई हे होते जेथे AQI 300 च्या पुढे राहिला.
दिल्लीच्या तुलनेत मुंबईची हवा खराब
सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR-इंडिया) नुसार, गुरुवारी सकाळी मुंबईत AQI पातळी 166 नोंदवली गेली, तर दिल्लीत ती 117 होती. बुधवारी संध्याकाळी 6 वाजता मुंबईच्या हवेतील PM10 पातळी 143 होता, तर दिल्लीत 122 होता. मुंबईचा AQI मंगळवारी 113 होता. तर दिल्लीचा AQI ८३ आहे. बुधवारी धुक्यामुळे मुंबई उपनगरीय नेटवर्कच्या मुख्य मार्गावरील लोकल ट्रेन १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.
काय म्हणाले आयएमडी?
आयएमडीचे संचालक सुनील कांबळे यांनी सांगितले की, यंदा पाऊस लवकर संपणे, माती पूर्णपणे कोरडी होणे, प्रकल्पांमधून उडणारी धूळ आणि वाढती वाहतूक ही विषारी हवेची प्रमुख कारणे आहेत. ते म्हणाले की, 10 ऑक्टोबरलाच पाऊस माघारला, जमिनीची माती पूर्णपणे कोरडी झाली आहे, सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये उडणारी धूळ आणि वाढलेली वाहतूक हे सर्व मोठे घटक आहेत. यापूर्वी ऑक्टोबरमध्येही असे घडले आहे की AQI खराब श्रेणीत गेला आहे. कधी पाहावे लागेल. बीएमसीने एक समिती स्थापन केली असून ते यावर तोडगा काढत आहेत.
मंत्री दीपक केसरकर यांनी शहरात प्रदूषण वाढल्याची दिली कबुली
या संपूर्ण प्रकरणावर महाराष्ट्र सरकारचे मंत्री दीपक केसरकर यांनी शहरात वायू प्रदूषण वाढल्याची कबुली दिली. शहरातील मेट्रो, पूल तसेच रिअल इस्टेट प्रकल्पांमुळे हे केमिकल नसून धुळीचे प्रदूषण होत असून ते थांबवण्यासाठी अधिकारी मार्ग शोधत असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या हिवाळ्याबद्दल बोलायचे झाले तर प्रदूषणाच्या बाबतीत मुंबई जगात दुसऱ्या क्रमांकावर होती. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात सुमारे 14 दिवस असे होते जेव्हा हवेची गुणवत्ता खराब ते अतिशय खराब श्रेणीत होती.