मुंबई: एरवी रस्त्यांवर खड्डा खणला किंवा बॅनर्स लावले म्हणून दंड आकारणारी मुंबई महानगरपालिका एका धडक कारवाईमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. मुंबई महानगरपालिकेने मालमत्ता कर थकविणाऱ्या मेस्को एअरलाईन्सला चांगलाच दणका दिला. पालिकेने कराची थकबाकी वसूल करण्यासाठी या कंपनीची दोन हेलिकॉप्टर्सच जप्त केली आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या या धडक कारवाईची चांगलीच चर्चा रंगली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनापरवाना मंडप : गणेश मंडळांविरोधात पालिकेची कठोर कारवाई


मेस्को एअरलाईन्सने तब्बल १,६४,८३,६५८ रुपयांचा मालमत्ता कर थकवला होता. पालिकेने वारंवार नोटीस पाठवूनही मेस्को एअरलाईन्सने कराची रक्कम भरली नाही. त्यामुळे शेड्युल के अंतर्गत पालिकेने मेस्को एअरलाईन्सची दोन हेलिकॉप्टर्सच ताब्यात घेतली. 


वानखेडे स्टेडिअमच्या १२० कोटींच्या करमाफीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे


या कारवाईबाबत माहिती देताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, पालिकेवर सध्या मोठ्या प्रकल्पांचा भार आहे. त्यासाठी मोठ्याप्रमाणात निधीची आवश्यकता आहे. अशातच जकात आणि अन्य स्रोतांच्या माध्यमातून येणारे उत्त्पन्न बंद झाले आहे. त्यामुळे पालिकेने थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई सुरु केल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.