भेंडीबाजार इमारत दुर्घटना : मृतांचा आकडा ३३ वर, १३ जखमींवर जेजेत उपचार
भेंडीबाजार येथील पाकमो़डिया मार्गावर गुरुवारी झालेल्या इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा ३३ वर पोहोचलाय. या दुर्घटनेत १३ जण जखमी असून त्यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुंबई : भेंडीबाजार येथील पाकमो़डिया मार्गावर गुरुवारी झालेल्या इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा ३३ वर पोहोचलाय. या दुर्घटनेत १३ जण जखमी असून त्यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अजुनही इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे आणखी लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. अग्निशमन दल, आणि एनडीआरएफचे जवान ढिगाऱ्याखालून अडकलेल्यांना काढण्याचं काम अजूनही करत आहेत.
जोपर्यंत अडकलेल्या सर्वांना बाहेर काढण्याचे काम पूर्ण होत नाही, तोवर बचाव कार्य सुरू ठेवणार असल्याचं एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेय. दरम्यान, या इमारतीत नर्सरी चालवली जात होती. मात्र, सुटी असल्याकारणाने नर्सरी बंद होती. अन्यता ही दुर्घटना चिमुकल्यांवर बेतली असती, अशी माहिती पुढे आलेय.
आतापर्यंत ४६ लोकांना वाचविण्यात यश आलेय. तर जेजे रुग्णालायत ८ पुरुष आणि १ महिला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर २ पुरुष आणि एक महिलेला उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. घटनास्थळी ८ अग्निशामक दलाच्या गाड्या असून एक बचाव व्हॅन आणि बचाव पथक कार्यरत आहे. तसेच त्याठिकाणी रुग्णावाहिकाही तैनात करण्यात आल्या आहेत.
मृतांची नावे
हसन आरसीवाला (४५), तसलीम आरसीवाला (४५), फातिमा सय्यद जाफर (१४), नसीर अहमद (२४), सय्यद जमाल जाफर (१९), बच्चुआ (२२), नसीर गुलाम शेख (२५), सकीना चश्मावाला (५०), कयुम (२५), रईस (५८), रिझवान (२५), मुस्तफा शहा (२२), नसिरुद्दिन अब्बास चश्मावाला (७१), हाफीज मोहसिन शेख (३८), अल्ताफ हैदर मन्सुरी (१२), अब्बास निजामुद्दिन चश्मावाला (४०), अहमदतुल्ला अब्बास चश्मावाला (३), अफजल आलम (२०), रेश्मा जाफर सय्यद (३८), जाफर सय्यद (४०)
कही जखमींची नावे
तसलीम चश्मावाला, फातिमा उमेदवाला, अब्दुल लतीफ, सईद अहमद, सलीम हुसेन, गुलाम बोरा, इक्बाल खान, सैफुद्दिन कुरेशी, अहमद अली, खान कमरूल हसन, अफजल शेख, रुफीया, जुजन हुसन आरसीवाला.