मुंबई : नव्या कृषी कायद्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये बैठकांनंतरही कोणताही तोडगा निघालेला नाही. कृषी कायद्याविरोधात पंजाब, उत्तरप्रदेश, हरियाना, राजस्थान इत्यादी राज्यातील शेतकरी आंदोलन करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधी पक्षांकडून ही या शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. शेतकरी संघटनांनी येत्या ८ डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. आतापर्यंत अनेक संघटनांनी याला पाठिंबा दर्शवला आहे.


मुंबईतल्या डबेवाला असोशिएशनने देखील शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. 'शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. दिल्लीत निर्धाराने एकवटलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. करोना आणि लॅाकडाऊन मुळे देशांतील कामगार आधी देशोधडीला लागला आहे. यातून डबेवाला कामगार ही सुटलेला नाही. किमान देशातील शेतकरी तरी देशोधडीला लागू नये असे डबेवाला कामगाराला वाटते. आज दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत ठामपणे राहणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.' असं मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी म्हटलं आहे.