`लालबाग राजाच्या मंडपात मुजोरी करणाऱ्यांना कार्यकर्त्यांना तुरूंगात डांबा`
लालबागच्या राजाच्या मंडपात कार्यकर्त्यांच्या मुजोरीवर माजी पोलीस अधिकाऱ्यांनीही जोरदार टीका केलीय.
मुंबई : लालबागच्या राजाच्या मंडपात कार्यकर्त्यांच्या मुजोरीवर माजी पोलीस अधिकाऱ्यांनीही जोरदार टीका केलीय. मुजोर कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करून त्यांना तुरूंगात डांबायला हवं, अशी मागणी माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी केलीय. हे असंच सुरू राहिलं तर पोलीस ठाण्यात जाऊनही मारायला हे कार्यकर्ते कमी करणार नाहीत, अशी भीतीही या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलीय.
कशासाठी ही दादागिरी?
धर्मादाय आयुक्तांकडून चौकशी होणार
लालबागचा राजा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या अरेरावीची गंभीर दखल धर्मादाय आयुक्तांनी घेतलीय. मंगळवारी लालबागच्या राजाच्या मंडपात कार्यकर्त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. या प्रकरणाची आता धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत चौकशी केली जाणार आहे. धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी बुधवारी स्वतः लालबागच्या राजाच्या मंडपात जाऊन घडल्या प्रकाराची प्राथमिक चौकशी केली.
मुंबईकरांना काय वाटतेय