मुंबई : शहर आणि उपनगरातील रेल्वेची स्थिती इतकी भीषण आहे आणि बुलेट ट्रेन्स काय आणताय? मोदींना बुलेट ट्रेन करायची असेल तर गुजरातमध्ये करावी, जबरदस्ती केली तर ती आमच्याकडूनही होईल. आम्ही बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही, असा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मुंबईत एलफिन्स्टन येथे काल घडलेली घटना दुर्दैवी आहे. काल घटनास्थळी जाऊन मी यंत्रणेवर ताण देऊ इच्छित नव्हतो. मंत्री संत्री फक्त चॅनेलवाले असतात म्हणून जातात, असे राज ठाकरे म्हणालेत.


प्रशासनाला आमच्या पद्धतीनं जाब विचारुच, असे सांगत राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनालाही इशारा दिलाय. मुंबईत पाऊस काल पहिल्यांदा पडला का? पावसामुळे कालची घटना झाली म्हणता, पाऊस काय पहिल्यांदा पडलाय, असा प्रतिसवाल राज यांनी केला.


प्रशासनाचा निषेध करण्यासाठी  येत्या ५ ऑक्टोबरला चर्चगेट स्टेशनला मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मोर्चा काढणार आहे, रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहे. माझी मुंबई आणि ठाणेकरांना विनंती आहे की तुम्ही पण सामील व्हा, प्रश्न गर्दीचा नाही पण या प्रशासनाला जाब विचारायला या, असे आवाहन राज यांनी यावेळी केले.


- मोदींना बुलेट ट्रेन करायची असेल तर गुजरातमध्ये करावी, जबरदस्ती केली तर ती आमच्याकडूनही होईल : राज ठाकरे
- मुंबईत बुलेट ट्रेनची एक वीटही उभारू दिली जाणार नाही. जोरजबरदस्ती केलीत तर आमच्याकडून पण होईल. लोकांच्या गरजा समजून घ्या. जोर जबरदस्ती मुंबईत करायची नाही - राज ठाकरे
- फेरीवाल्याना आम्ही आधी समजवून सांगणार, आणि जर नाही ऐकलं तर आमच्या पद्धतीने त्यांना समजवून सांगणार 
- अनधिकृत बांधकामं आहेत, फेरीवाल्यानी फुटपाथ व्यापलेत, कचऱ्याचं साम्राज्य आहे, ते सोडून योगा कसली करायला सांगता ?
- प्रशासनाला आमच्या पद्धतीनं जाब विचारू - राज ठाकरे 
मुंबईत पाऊस काल पहिल्यांदा पडला का? - राज ठाकरे
- पावसामुळे कालची घटना झाली म्हणता,पाऊस काय पहिल्यांदा पडलाय? 
- येत्या ५ ऑकटोबरला चर्चगेट स्टेशनला मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी मोर्चा काढणार आहे, रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहे
- माझी मुंबई आणि ठाणेकरांना विनंती आहे की तुम्ही पण सामील व्हा, प्रश्न गर्दीचा नाही पण या प्रशासनाला जाब विचारायला या
- येत्या ५ ऑकटोबरला चर्चगेट स्टेशनला मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी मोर्चा काढणार आहे, रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहे
- आपल्या देशात अतिरेक्यांची गरजच नाही, इथली माणसंच आपल्या माणसांना पुरेशी आहेत 
- बुलेट ट्रेनकरता १ लाख कोटी आहेत पण काकोडकरांनी सुचवलेल्या उपायांकरता पैसे नाहीत ?
- शास्त्रज्ञ अनिल काकोडकरांनी रेल्वे सुरक्षा सुधारण्यासाठी सरकारला एक अहवाल दिला होता, ज्यात त्यांनी १ लाख कोटी मागितले होते
-पुण्या-मुंबईत पायाभूत सुविधाच नाहीत, ही शहरं आचके देत आहेत- राज ठाकरे
- मुंबईत एलफिन्स्टन येथे काल घडलेली घटना दुर्दैवी आहे. काल घटनास्थळी जाऊन मी यंत्रणेवर ताण देऊ इच्छित नव्हतो. मंत्री संत्री फक्त चॅनेलवाले असतात म्हणून जातात - राज ठाकरे