Mumbai Local News Update: मुंबईकरांचा प्रवास सुखाचा व आरामदायी व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. मध्य रेल्वेवर दिवसेंदिवस प्रवाशांची गर्दी वाढत आहे. गर्दी कमी करण्यासाठी व प्रवास सुरळीत होण्यासाठी कुर्ला ते सीएसएमटीपर्यंत पाचवी-सहावी मार्गिका सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे प्रवासाचा वेग वाढवण्यासाठी कुर्ला ते सीएसएमटीपर्यंत पाचवी व सहावी मार्गिका टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2008-09 मध्ये या प्रकल्पासाठी मंजुरी देण्यात आली होती. या दोन नव्या रेल्वे लाइन उभारण्याच्या प्रकल्पासाठी 1 हजार 337 कोटींचा खर्च येणार आहे. 2021 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र भूसंपादनाच्या अडचणीमुळं हा प्रकल्प रखडला होता. मात्र आता भूसंपादनाची प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 


मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळ 1 हजार 263 चौरस मीटरपेक्षा जास्त जमीन खरेदी करण्याची राज्य सरकारची योजना आहे. त्या जमिनीचा वापर दोन रेल्वे लाइन बांधण्यासाठी केला जाणार आहे. यासंबंधी अधिसूचनादेखील जारी करण्यात आहे. कुर्ला येथील 1,263 चौरस मीटर मालमत्तेची आवश्यकता आहे. मस्जिद स्थानकाजवळ सीएसएमटी स्थानकाजवळ आणि भायखळा परिसरात जमीन आहे. या जागेची मोजणी सुरू आहे. 


कसा असेल प्रकल्प?


दोन नवीन मार्ग जोडण्याचा पहिला टप्पा कुर्ला ते परळ तर दुसरा टप्पा परळ-सीएसएमटी दरम्यान असणार आहे. कुर्ला ते परळच्या पट्ट्यात रेल्वेला दहा हजार चौरस मीटर जमिनीची आवश्यकता असून त्याआधीच सहा हजार चौरस मीटर जमीन संपादित झाली आहे. 


प्रवाशांना काय फायदा होणार?


सीएसएमटी ते कुर्लादरम्यान पाचवी, सहावी मार्गिका स्वतंत्र्य नाही. त्यामुळं जलद लोकलच्या दोन मार्गिकांवरुन मेल आणि एक्स्प्रेस धावतात. त्यामुळं लोकल सेवा विस्कळीत होते. नियमित वेळापत्रक बिघडते त्यामुळं प्रवासाचा वेगही कमी होतो. या प्रकल्पामुळं मुंबईकरांचा प्रवास जलदगतीने होणार आहे. तसंच, लोकलच्या फेऱ्याची संख्याही वाढणार आहे. 


परळपासून सुमारे 200 नवीन लोकल रेल्वे सेवा सुरू करण्यासाठीही हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. 2008मध्ये या प्रकल्पासाठी 890.89 कोटी खर्चास मंजुरी देण्यात आली होती. मात्रा आता या प्रकल्पाचा खर्च 1 कोटी 337 कोटीपर्यंत गेला आहे. दोन टप्प्यात हा प्रकल्प विभागला गेला असून कुर्ला ते परळपर्यंत 10.1 किलोमीटरचा एक टप्पा तर दुसरा टप्पा हा परळ ते सीएसएमची पर्यंत 7.4 किलोमीटरचा आहे.