मुंबई : कोरोनाचा वाढता (Corona) संसर्ग पाहता राज्यामध्ये कोरोनाची नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीची अंमलबजावणी ही आज मध्यरात्रीपासून करण्यात येणार आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावं, असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. मात्र काही बेजबाबदार नागरिक कोणालाही न जुमानता नियमांना केराची टोपली दाखवत आहेत. या अशाच बेजबाबदार लोकांमुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांच्यावर हात जोडण्याची वेळ आली. (mumbai mayor kishori pednekar appeal to mumbaikar about follow corona rules at gate way of india and juhu chowpatty) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की काय झालं?  


राज्यात आज मध्यरात्रीपासून कडक निर्बंध लागणार आहेत. या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी महत्वाच्या पर्यटन स्थळांची पाहणी केली. या त्यांनी गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी यासारख्या पर्यटन स्थळी नागरिक कोरोना नियमांचं पालन करतायेत की नाही, याची पाहणी केली. या दरम्यान त्यांना अनेक बेजबाबदार नागरिक सापडले. या अशांसमोर महापौरांना हात जोडून मास्क घाला, असं आवाहन करण्याची वेळ आली.