Mumbai News : मुंबई म्हणजे मायानगरी, मुंबई म्हणजे स्वप्ननगरी आणि मुंबई म्हणजे अनेकांचच पोट भरणारं शहर. अशा या मुंबईनं आतापर्यंत अनेकांटी पोटं भरली, अनेकांना आसरा दिला आणि कित्येकांना मोठंही केलं. असं हे शहर आता जगात एक वेगळी ओळत बनवताना दिसत आहे. ही ओळख म्हणजे श्रीमंतांची मुंबई. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्यांदाच मुंबईनं श्रीमंतांच्या संख्येमध्ये चिनमधील बीजिंग या महानगराला मागे टाकलं आहे. सर्वाधिक श्रीमंतांची वस्ती असण्याच्या बाबतीत मुंबई आशिया खंडातील सर्वात पहिली अब्जाधीश राजधानी ठरली आहे. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार शहरातील 603 वर्ग किलोमीटर म्हणजेच साधारण दीड लाख एकरांमधील अंतरामध्ये सर्वाधिक अब्जाधीशांचं वास्तव्य आहे. 


हुरून रिसर्चनं प्रसिद्ध केलेल्या ग्लोबल रिच लिस्ट 2024 नुसार जिथं चीनमध्ये भारतातील 271 अब्जाधीशांच्या तुलनेत 814 अब्जाधीश आहेत तिथं मुंबईत बीजिंगच्या 91 अब्जाधीशांच्या तुलनेत 92 अब्जाधीश आहेत. जागतिक क्रमवारीत न्यूयॉर्क 119 अब्जाधीशांसह आघाडीचं शहर असून, त्याखालोखाल 97 अब्जाधीशांसह लंडनचा क्रमांक येतो. तर, मुंबई या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. 


हेसुद्धा वाचा : Konkan Railway चा मोठा निर्णय; आता गणेशोत्सवादरम्यानच्या तिकीटाचीही चिंता मिटली


देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असणाऱ्या मुंबई शहरामध्ये असणाऱ्या अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीचा आकडा आहे 445 अब्ज डॉलर, म्हणजेच 37,090,303,665 रुपये. मागील वर्षाच्या तुलनेत हा आकडा 47 टक्क्यांनी वाढला आहे. चीनमधील बीजिंगचं सांगावं तर, इथ अब्जाधीशांच्या संपत्तीचा एकूण आकडा आहे 265  अब्ज डॉलर म्हणजेच 22,087,484,205 रुपये. चीनच्या शहरातील हा आकडा 28 टक्क्यांनी घटला आहे. 


शहरातील अब्जाधीशांच्या यादीत एचसीएलच्या शिवा नाडर आणि त्यांच्या संपूर्ण कौटुंबीक संपत्तीच्या आकड्यामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय सीरम इंस्टीट्यूटच्या सायरस पूनावाला यांच्या एकूण संपत्तीमध्ये 82 बिलियन डॉलरसह साधारण घट पाहायला मिळाली. तर, सन फार्मास्यूटिकल्सचे दिलीप सांघवी या यादीत 61 वे आणि कुमार मंगलम बिर्ला 100 वे असल्याचं वृत्त आहे.