राणा दाम्पत्य खारच्या निवासस्थानी, मुंबई पोलिसांनी बजावली प्रतिबंधात्मक नोटीस
आमदार रवी राणा थोड्याचवेळा पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार
मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) हे दाम्पत्य मुंबईत दाखल झाले आहे. मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर (Matoshree) हनुमान चालिसाचं (Hanuman Chalisa) पठण करण्याचं आवाहन राणा दाम्पत्याने दिलं आहे.
राणा दाम्पत्य रेल्वेने प्रवास करण्याची शक्यता होती. मात्र, शिवसेनेचा (ShivSena) विरोध लक्षात घेता त्यांनी विमानाने प्रवास केला. राणा दाम्पत्य विमाने मुंबईत दाखल झाले आहे. थोड्याच वेळात आमदार रवी राणा पत्रकार परिषद घेणार असून आपली भूमिका मांडणार आहेत.
नंदगिरी गेस्टहाऊसवर राणा दाम्पत्याच्या असल्याच्या माहितीवरून गेस्ट हाऊसबाहेर शिवसैनिकांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. टाळ वाजवत भजन करत हनुमान चालिसा म्हणत शिवसैनिकांनी देवगिरी गेस्टहाऊसबाहेर गर्दी केली होती.
राणा दाम्पत्याला नोटीस
राणा दाम्पत्य खारच्या निवासस्थानी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कायदा सुव्यस्था बिघडू नये यासाठी राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी 149 CRPC नुसार नोटीस दिली आहे. कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याची जबाबदारी राणा दाम्पत्याची असेल असं पोलिसांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. तसेच कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
नवनीत राणा मुंबईत येणार शिवसेना आक्रमक
हनुमान चालीसा म्हणण्यासाठी राणांसोबत 500 हून अधिक कार्यकर्ते असणार आहेत. रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले होते की त्यांनी हनुमान चालिसेचं पठण करावे, नाहीतर आम्ही स्वतः येऊन मातोश्रीसमोर पठण करु. त्याप्रमाणे राणा दाम्पत्य आता आज मुंबईत विमानाने दाखल झाले आहे.