मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्स इथल्या महानगरपालिकेच्या पार्कींग भागात पावसाचं पाणी शिरलं आहे. यामुळे तब्बल 400 पेक्षा जास्त गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. या सर्व गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. (Mumbai Rains Waterlogging at Kandivali Thakur complex parking ) तर दुसऱ्या बाजूला बीडीडी चाळीत अक्षरशः धबधब्याचं स्वरूप आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कांदिवलीतील पार्किंग भागात मोठ्या प्रमाणात गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या. गेल्या दोन दिवस कोसळणाऱ्या तुफान पावसाने या पार्किंग भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. या ठिकाणी असलेल्या गाड्यांना जलमय रुप निर्माण झालंय. यासर्व गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. पावसाचा जोर ओसरल्यानंतर या गाड्यांमधून पाणी बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. पाणी गेल्यानं वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. 


मुसळधार पावसामुळे वरळीतल्या बीडीडी चाळीला पावसामुळे धबधब्याचं स्वरूप आलंय. पावसामुळे लोकांचे प्रचंड हाल झालेत. अगदी लोकांच्या घरात पाणी शिरण्याची भीती स्थानिकांना वाटत आहे. मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढला. पूर्व, पश्चिम उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू आहे. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर विक्रोळीत रस्त्यांना नदीचं रुप आलं आहे.