मुंबई: गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे जरा कुठे उसंत मिळेल असे वाटत असतानाच शनिवारी मुंबईत या व्हायरसने पुन्हा उसळी घेतली. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मुंबईत शनिवारी कोरोनाचे आणखी १८४ रुग्ण आढळून आले. मुंबईत एकाच दिवसात इतके रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात १४,३७८ कोरोनाग्रस्त; मरकजमुळे २३ राज्यात व्हायरसचा फैलाव

यामध्ये शहरातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या धारावीतील १६ रुग्णांचा समावेश आहे. पालिका प्रशासनाकडून मुंबईतील आठ वॉर्डमध्ये अतिगंभीर परिस्थिती असल्याचे यापूर्वीच सांगण्यात आले होते.तर राज्यातही आज कोरोनाचे ३२८ नवे रुग्ण आढळून आले. यामध्ये पुण्यातील ७८ नव्या रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ३,६४८ इतका झाला आहे. 



Coronavirus: मुंबईच्या आठ वॉर्डमधील परिस्थिती अतिगंभीर


दादरमध्ये कोरोनाचा आणखी एक रूग्ण वाढला 
दादर परिसरात शनिवारी कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळून आला. गोखले रोडवरील कुलकर्णी हाईटसमधील ६५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समजते. त्यामुळे आता दादरमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २२ इतकी झाली आहे.