Coronavirus: मुंबईच्या आठ वॉर्डमधील परिस्थिती अतिगंभीर

शुक्रवारच्या आकडेवारीनुसार मुंबईत कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी धोका अजूनही कायम आहे. 

Updated: Apr 18, 2020, 03:42 PM IST
Coronavirus: मुंबईच्या आठ वॉर्डमधील परिस्थिती अतिगंभीर title=

मुंबई: राज्यातील कोरोना प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र असलेल्या मुंबईच्या आठ वॉर्डमधील परिस्थिती अतिगंभीर आहे. या आठ हॉटस्पॉटच्या परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या १०० हून अधिक आहे. शुक्रवारच्या आकडेवारीनुसार मुंबईत कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी धोका अजूनही कायम आहे. धारावी परिसर हा मुंबईतील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट आहे. काल याठिकाणी १५ नवे रुग्ण आढळून आले होते. तर धारावीत आतापर्यंत १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या २0८५ झाली असून १२२ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

जी साऊथ-  वरळी, प्रभादेवी, लोअर परळचा परिसर - 389 
 ई वॉर्ड- भायखळा ,  भायखळा फायर ब्रिगेडच्या आसपासचा भाग -194 
जी नॉर्थ-  दादर, माहिम, धारावी-142
डी वॉर्ड- नाना चौक ते मलबार हिल परिसर,  -141
के वेस्ट - अंधेरी पश्चिमचा भाग-123
एल वॉर्ड-  कुर्ला परिसराचा समावेश-  115
एच इस्ट-- वांद्रे पूर्व चा भाग, वाकोला परिसर , कलानगर ते सांताक्रुझ -113
 के ईस्ट- अंधेरी पूर्व, जोगेश्वरी - १०६ रूग्ण