Mega Water Cut in Mumbai Thane : मुंबई आणि ठाण्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण मुंबई (Water Cut in Mumbai) आणि ठाण्यात (Water Cut in Thane) पुढील दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. आज आणि उद्या  31 जानेवारीला मुंबईतील काही भागात नळांना पाणी येणार नाही आहे. 


नळाचं पाणी गायब!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भांडुप संकुलमधील जलशुद्धीकरण ( BMC Water Cut In Mumbai ) केंद्रातील जलवाहिनी जोडण्याचं काम केलं जाणार आहे. अतिरिक्त 4,000 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी तोडण्याचं काम आज आणि उद्या करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज आणि उद्या पाणीकपातीचं संकटाला सामोरे जावं लागणार आहे. 


 'या' विभागात पाणीपुरवठा बंद


मुंबई महापालिकेकडून देण्यात आलेल्या माहिती असं सांगण्यात आलं आहे की, 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारीपर्यंत काही विभागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने येणार आहे. मुंबईतील आज नेमक्या कुठल्या विभागात पाणीपुरवठा होणार नाही ते जाणून घेऊयात. (mumbai thane water cut in today and tomorrow Water supply will be shut off in this area marathi news)


पश्चिम उपनगर 


  • के पूर्व

  • के पश्चिम

  • पी दक्षिण

  • पी उत्तर

  • आर दक्षिण

  • आर मध्य

  • आर उत्तर

  • एच पूर्व 

  • एच पश्चिम 


पूर्व उपनगर


  • एस विभाग

  • एन विभाग 

  • एल विभाग



ठाणेकरांनो लक्ष द्या!


ठाणेकरांनो आज तुमच्या नळाला पाणी येणार नाही. कारण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ठाणे महापालिकेने (TMC) आज 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जांभूळ जलशुद्धीकरण केंद्राच्या सुधारणा आणि मजबुतीकरणासाठी हे काम केलं जाणार असल्याच सांगण्यात आलं आहे.  आज दुपारी 12 वाजेपासून मंगळवारी 31 जानेवारी दुपारी 12 वाजेपर्यंत नळाला पाणी येणार नाही आहे.



'या' भागात पाणीपुरवठा बंद 


दिवा आणि मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत येणार मुंब्रा बायपास, किस्मत कॉलनी, चांद नगर, एमएम व्हॅली आणि मुना फायरब्रिज या भागात आज आणि उद्या 12 वाजेपर्यंत पाणी येणार नाही.