Mumbai University Senate Election: मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीसंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम अखेर मार्गी लागला आहे.विद्यापीठाच्या त्रिसदस्यीय समितीचा मतदार यादी छाननीचा अहवाल तयार झाला आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांच्या आक्षेपानंतर मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती. तसेच चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदार आशिष शेलार यांनी केलेले आरोप समितीने खोडून काढल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. विद्यापीठ समितीने काढलेल्या निष्कर्षामुळे आशिष शेलार यांना मोठा धक्का मानला जात आहे. 


मुंबई विद्यापीठ निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले असताना  अचानक याला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारच्या निर्देशानंतर मुंबई विद्यापीठाकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला. यानंतर ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी, छात्र भारती अशा सर्व विद्यार्थी संघटनांनी या निर्णयावर टिका केली होती.