Mumbai University Senet Election: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. या निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले असताना अचानक याला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारच्या निर्देशानंतर मुंबई विद्यापीठाकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला. यानंतर ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी, छात्र भारती अशा सर्व विद्यार्थी संघटनांनी या निर्णयावर टिका केली. आता शिवसेना आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी 5 प्रश्न विद्यापीठाला विचारले आहेत. 


आदित्य ठाकरेंनी विचारलेले प्रश्न 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1)मुंबई विद्यापीठावर अशी कोणती आणीबाणीची परिस्थिती आली होती की, रात्री उशिरा विशेष व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीद्वारे रात्री 11.30 वा परिपत्रक जारी करून निवडणुका थांबवाव्या लागल्या? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.


2) राज्यपाल जे कुलपती आहेत त्यांच्याशी चर्चा करण्यात आली होती का? आणि यासाठी कोणी आदेश दिले होते?


3) प्राचार्य, व्यवस्थापन, शिक्षक प्रतिनिधीच्या सिनेट निवडणुका घेण्यात आल्या आहेत. केवळ नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघ का रखडला आहे?


4) 5.15 लाख मतदारांकडून 20 रुपये शुल्क वसूल करण्यात आले आहे. त्या बद्दल काय? 


राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक, आदित्य ठाकरेंचा घणाघात


5) या निवडणुका आधीच वर्षभर लांबल्या असल्याने निवडून आलेल्या सिनेट प्रतिनिधींना सेवा देण्यासाठी कमी कालावधी मिळेल, हे मुद्दाम घडवले जाते का?



आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु रवींद्र कुळकर्णी यांना हे पत्र लिहिले आहे. या पत्राला मुंबई विद्यापीठाकडून काय मिळते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


मुंबई विद्यापिठातील सिनेट निवडणुका स्थगित करण्यात आल्यामुळे राजकारण तापलंय. भाजपला निवडणुकांशिवाय सत्ता गाजवायची असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलीय. तर युवासेनेनं बोगस मतदार नोंदणी केल्यामुळेच स्थगिती दिल्याचा दावा मुंबई  भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला. 


MIDC Job: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना मुंबईत नोकरी


मनसेकडून राज्यपालांना पत्र 


मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आल्यानंतर मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनीही जोरदार टीका केलीय. अमित ठाकरे यांनी राज्यपालांना यासंदर्भात पत्र लिहिलंय. सिनेट निवडणूक विद्यापीठाने स्थगित करणं अत्यंत धक्कादायक आणि अशोभनीय आहे. दिल्लीतील सत्ताधीशांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्यांना लोकशाही गाडून हुकूमशाहीनेच कारभार हाकायचा आहे हे स्पष्ट आहे, अशी टीका अमित ठाकरे यांनी केलीय. या प्रकरणात राज्यपालांनी लक्ष घालण्याची मागणी अमित ठाकरेंनी केलीय.