Weather Forecast: सध्या संपूर्ण देशभरात नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. अशा परिस्थितीत पाऊस कधी पडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. नैऋत्य मान्सून अंदमान बेटांवर आधीच दाखल झाल्याची माहिती आहे. याशिवाय 31 मे पर्यंत केरळमध्ये पोहोचण्याच्या मार्गावर आहे. सोशल मीडियावरील ‘Mumbai Rains’ नुसार, मुंबईत मे महिन्याच्या अखेरीसच पाऊस सुरू होण्याची शक्यता वर्तवली जातेय. 27 मे ते 31 मे दरम्यान, मुंबईमध्ये पाऊस पडण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र दुसरीकडे IMD च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 ते 4 दिवसांनी थोडा फरक पडण्याचा शक्यता आहे. परंतु सध्या मान्सून नियोजित वेळेत येण्याची अपेक्षा आहे. या महिन्याच्या अखेरीस केरळमध्ये मान्सूनची प्रगती पाहिल्यानंतर मुंबईच्या आगमनाची नेमकी तारीख जाहीर केली जाईल. 


अंदाजानुसार मान्सून अंदमानात दाखल झाला असला तरी मुंबईत मान्सूनच्या आगमनासाठी 10-11 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आयएमडीजीच्या मुंबई विभागाचे संचालक सुनील कांबळे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला आहे. 31 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचणार. यानंतर मुंबईला मान्सून येण्यासाठी 10 ते 11 जूनची वाट पाहावी लागणार आहे. यामध्ये तीन ते चार दिवसांचा फरक पडण्याची शक्यता आहे. 


IMD च्या अंदाजानुसार, यंदाच्या वर्षी मान्सूनमध्ये पाऊस सामान्य असणार आहे. दरम्यान, मान्सूनपूर्व काळात राज्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे सातारा, सिंधुदुर्ग, अहमदनगर जिल्ह्यांसह राज्याच्या विविध भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. 


मुंबईकर उकाड्याने त्रस्त


पावसाच्या आशेवर असताना मुंबईकरांन मात्र प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागतोय. घराच्या आत असो की बाहेर, मुंबईकर अगदी घामाने त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळीही खूप उष्णतेचा सामना करावा लागतोय. अशातच लवकरात लवकर पाऊस पडावा, अशी सर्वांचीच इच्छा आहे.