मुंबई : राणा दाम्पत्याने मातोश्रीबाहेर (Matoshree) हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करण्याच्या निर्णयावरुन माघार घेतली. पण जोपर्यंत ते माफी मागत नाही तोपर्यंत शिवसैनिक घराबाहेरुन हलणार नाहीत, असा इशारा शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांनी दिला आहे. आता राणा दाम्पत्याच्या मदतीसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) मैदानात उतरले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नारायण राणे यांचा इशारा
पोलिसांनी हस्तक्षेप करुन राणा कुटुंबिय घराबाहेर पडणार असतील तर त्यांना जाऊ द्या, जर त्यांना अडवलं,  जायला दिलं नाही तर मी स्वत: जाणार राणाच्या घरी, राणाला बाहेर काढणार, बघुया कोण येतं तिकडे, मर्द आहेत ना या तिकडे असं आव्हान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिलं आहे.  त्या अगोदर पोलिसांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढावं असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. 


महाराष्ट्रात सरकार आहे असं काही वाटत नाही, आणि सरकारी पक्षच महाराष्ट्रातलं मुख्यत मुंबईत वातावरण बिघडू पाहतायत, शिवसेनेच्या नेत्यांची भाषणं किंवा पत्रकार परिषद ऐकल्यानंतर या सर्वांना संजय राऊत, परब यांना मुख्यमंत्री आपल्या पक्षाचं आहे की  नाही याचं भान आहे का हा प्रश्न आहे अशी टीका राणे यांनी केली.


सत्ता असतानाही ते आव्हान देतायत, संजय राऊत तर स्मशानात व्यवस्था करुन ठेवा आम्हाला धमक्या दिल्या तर, परब म्हणतायत जो पर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत राणा दाम्पत्याला आम्ही जाऊ देणार नाही,  या सर्व धमक्या पाहात असताना राज्यात पोलीस व्यवस्था आहे की नाही हा प्रश्न आहे, असं राणे यांनी म्हटलं आहे.


स्मशानात पाठवण्याची भाषा करणं गुन्हा नाही का, माफी नाही मागितली तर आम्ही घरातून बाहेर पडू देणार नाही, हा गुन्हा नाही का. काय करतायत पोलीस असा सवाल नारायण राणे यांनी विचारला आहे. 


शिवसेनेचे नेते सांगत होते, अमरावतीतून राणा दाम्पत्याला मुंबईत येऊ देणार नाही, त्या अमरावतीतच काय मातोश्रीच्या दरवाज्यात आल्या, कुठे होती शिवसेना झोपली होती का. मुंबईत येऊन देणार नाही म्हणजे काय मुंबई तुमची आहे का, उगाच बढाया मारतो तो संजय राऊत, शिवसेना हे करेल, शिवसेना ते करेल, कुठे आहे शिवसेना, मातोश्री बाहेर हजारो शिवसैनिक जमलेत, पण २३५ च्या पुढे एकही शिवसैनिक नव्हता, मी इथे येण्यापूर्वी मोजायला सांगितलं आणि राणाच्या घराबाहेर १२५ शिवसैनिक होते असा टोला राणेंनी लगावला.



हजारो, लाखो शिवसैनिक कशाला भीती वाटते का मातोश्रीला, पोलीस संरक्षण असताना, काय घेऊन जातील म्हणून भीती वाटते, मातोश्रीबाहेर बसून महिला छाती पिटतायत आपण छाता केव्हा पिटतो काय घडलं असतानाच ना, असा टोलाही राणे यांनी लगावला.


याला राज्य चालवणं म्हणतायत, जनतेसाठी कायदा सुव्यवस्था, अन्न, वस्त्र, निवारा देण्याऐवीज हे काय सुरु आहे. याला मारा, त्याला झोडा हे काय सुरु आहे अशी टीका नारायण राणे यांनी केली.