दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : सात डिसेंबरला होणाऱ्या विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात नारायण राणे उतरणार नाहीत, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी 'झी २४ तास'ला दिली आहे.


राज्य मंत्रिमंडळात समावेश होईल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढल्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये रिक्त होणाऱ्या विधानपरिषदेच्या ६ जागांपैकी १ जागेवर राणे यांची भाजप कोट्यातून वर्णी लागेल असं राणेंना आश्वासन देण्यात आलं आहे. त्याआधी राणे यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश होईल असंही सूत्रांचं म्हणणं आहे. 


राणेंकडून अद्याप अधिकृत भाष्य नाही


नारायण राणे यांनी मात्र पोटनिवडणुकीबाबत अद्याप अधिकृत भाष्य केलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतरच भूमिका जाहीर करीन, असे राणे यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची घेतील ती अंतिम भूमिकाही तितकीच महत्वाची ठरणार आहे.