COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मकरंद घोडके, झी मीडिया, अहमदनगर :  नाशिकचं मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा वादात अडकलंय... तुरुंगामध्ये चक्क सुपारी घेऊन हत्या होत असल्याचा आरोप झालायं. एखाद्या कैद्याचा नैसर्गिक मृत्यू दाखवून किंवा दुसऱ्या कैद्याच्या करवी असे प्रकार होत असल्याची शंका व्यक्त होतेयं. धक्कादायक बाब म्हणजे खुद्द तुरुंगातल्या एका कर्मचाऱ्यानं हे गंभीर आरोप केलेत. त्यांनी अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली गेलेली नाही.


गंभीर दखल घेणं गरजेचं


तुरूंगातील कर्मचारी अनील बुरकुल यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांपासून राज्यपालांपर्यत यासदर्भात तक्रार केली आहे. चोरी पासून दहशतवादापर्यंत गंभीर आरोप असलेले कैद्यांना कायद्याने शिक्षा होईलच. पण चुकीच्या पद्धतीने त्यांना बाहेर काढण्यास मदत करणे हे खूप गंभीर आहे. याची वेळीच दखल घेतली गेली पाहिजे.