मुंबई : गणेशोत्सवानंतर आता राज्यासह देशात नवरात्रोत्सवाचा (Navratri 2022) माहोल पहायला मिळतोय. कोरोनाच्या (Corona Restrictions) 2 वर्षानंतरं पहिल्यांदाच निर्बंधमुक्त सण साजरे केले जात आहेत. त्यामुळे यंदा गरबाप्रेमींमध्ये (Garaba) आनंदाचं वातावरण पहायला मिळतं. ठिकठिकाणी गरबारास आणि दांडियाचं (Dandiya) आयोजन करण्यात आलंय. यामध्ये राजकारणीही मागे नाहीत. राजकीय मंडळीही गरब्याच्या आनंद घेतायेत. (navratri 2022 bjp leader kirit somaiya and praveen darekar garba video viral on social media)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांच्या नाकी नऊ आणणाऱ्या भाजपच्या किरीट सोमय्या (Bjp Kirit Somaiya) यांनी गरब्यावर ठेका धरला. त्यांच्यासोबत भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनीही सोमय्या यांना चांगली साथ दिली. भाजपच्या या दोन्ही नेत्यांच्या गरब्याचा व्हीडिओ व्हायरल होतोय. 



रात्री 12 पर्यंत लाउडस्पीकर


यावर्षी नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करता यावा यासाठी १ ऑक्टोबर, २०२२ रोजी नवरात्रोत्सवासाठी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये यंदाच्या नवरात्रोत्सवासाठी सोमवार, ३ ऑक्टोबर आणि मंगळवार, ४ ऑक्टोबर या व्यतिरिक्त शनिवार, १ ऑक्टोबर हा आणखी एक वाढीव दिवस उपलब्ध होणार आहे.