मुंबई : ड्रग्ज प्रकरणात सातत्याने ट्विस्ट येत आहेत. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खानसह 6 प्रकरणांचा तपास काढून घेतल्यानंतर आता एनसीबीची एसआयटी आर्यन ड्रग्ज प्रकरणासह अन्य 5 प्रकरणांची चौकशी करणार आहे. या कामासाठी एसआयटीचे पथक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत पोहोचले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एजन्सी या प्रकरणांची चौकशी करेल


एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे पथक एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत पोहोचले. विमानतळावर उतरल्यानंतर सर्व अधिकारी मुंबई एनसीबी कार्यालयात पोहोचले. मुंबई ड्रग्ज पार्टी प्रकरणी समीर वानखेडे यांच्याकडून तपास काढून घेतल्यानंतर आता एसआयटी टीम आर्यन खानसह 6 प्रकरणांची चौकशी करणार आहे. एनसीबीचे डीडीजी ऑपरेशन्स संजय सिंह यांनी पुढील तपासाची सूत्र हाती घेतली आहेत.


देशभरातून निवडक अधिकारी


दिल्लीशिवाय देशातील इतर राज्यांतील एनसीबी युनिटमधील अनेक अधिकाऱ्यांनाही मुंबईत बोलावले जात आहे जे सर्व 6 प्रकरणांची चौकशी करतील. हे प्रकरण सातत्याने तापत आहे. ज्यावर संपूर्ण देशाच्या नजरा खिळल्या आहेत. मुंबईतील त्यांच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर डीडीजी संजय सिंह म्हणाले की त्यांची टीम आता उर्वरित बाबी पाहणार आहे. त्याचबरोबर समीर वानखेडे हे मुंबईच्या एनसीबीचे झोनल डायरेक्टर म्हणून कायम राहणार आहेत.


दिल्लीत काय चाललंय?


या प्रकरणावरून मुंबईत खळबळ उडाली असतानाच दिल्लीतही खळबळ उडाली आहे. खरे तर आर्यन खान प्रकरणातील तपास अधिकारी आशिष रंजन प्रसाद यांची एनसीबीच्या दक्षता पथकाने दोन दिवस दिल्लीत अनेक तास चौकशी केली. वास्तविक आशिष रंजन प्रसाद यांची NCN च्या दक्षता पथकाने चौकशी करण्याची ही दुसरी वेळ होती, त्याआधी मुंबईत त्यांचा जबाब नोंदवला गेला होता. याच महिन्याच्या 2 आणि 3 नोव्हेंबरला त्यांची चौकशी करण्यात आली होती.