मुंबई: ठाकरे सरकारच्या बहुचर्चित खातेवाटपाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. काँग्रेस आणि शिवसेना यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची खातेनिहाय यादी समोर आली आहे. यामध्ये अपेक्षेप्रमाणे अर्थखात्याची धुरा अजित पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर गेल्या आघाडी सरकारच्या काळात वादग्रस्त राहिलेले जलसंपदा खाते जयंत पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे. तर गृहमंत्रीपदाची जबाबदारी अनिल देशमुख यांच्यावर सोपविण्यात आली आहे. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कारभार सोपविण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचं खातेवाटप ठरलं; आदित्य ठाकरेंना पर्यावरण, दादा भुसेंकडे कृषी खाते


तत्पूर्वी काँग्रेस आणि शिवसेनेच्या संभाव्य खातेवाटपाच्या याद्याही समोर आल्या आहेत. काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे महसूल खात्याचा कारभार सोपवण्यात आला आहे. तर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची धुरा सोपविण्यात आली आहे. तर राज्यमंत्री असलेल्या विश्वजित कदम यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 


काँग्रेसकडून खातेवाटप जाहीर; चव्हाणांकडे सार्वजनिक बांधकाम, थोरातांकडे महसूल खाते


तर शिवसेनेकडून ठाकरे घराण्याचे वारसदार आणि पहिल्यांदाच आमदार झालेल्या आदित्य ठाकरे यांना पर्यावरण आणि पर्यटन अशी दोन खाती देण्यात आली आहेत. तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांच्यावर अनुक्रमे नगरविकास आणि उद्योग खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर राज्यातील तमाम शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या कृषी खात्याची धुरा दादा भुसे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. 



राष्ट्रवादीच्या संभाव्य खातेवाटपाची यादी पुढीलप्रमाणे:


अजित पवार - वित्त व नियोजन (अर्थमंत्री)
जयंत पाटील - जलसंपदा
छगन भुजबळ - अन्न व नागरी पुरवठा
अनिल देशमुख - गृह
दिलीप वळसे पाटील - उत्पादन शुल्क व कौशल्य विकास
धनंजय मुंडे - सामाजिक न्याय
हसन मुश्रीफ - ग्रामविकास
बाळासाहेब पाटील - सहकार व पणन
राजेंद्र शिंगणे - अन्न व औषध प्रशासन
राजेश टोपे - आरोग्य
जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण
नवाब मलिक - कामगार, अल्पसंख्याक विकास