राष्ट्रवादी काँग्रेस करणार चुनाभट्टी-बीकेसी उड्डाण पुलाचं लोकार्पण
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली हा लोकार्पण सोहळा होणार आहे.
मुंबई : चुनाभट्टी-बीकेसी उड्डाण पुलाचं आज राष्ट्रवादी काँग्रेस लोकार्पण करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली हा लोकार्पण सोहळा होणार आहे. लोकशाही आघाडी सरकारच्या काळात हा उड्डाणपूल मंजूर झाला होता. एमएमआरडीएनं या पुलाची निर्मिती केलीये.
आज सकाळी साडे दहा वाजता या पुलाचं लोकार्पण करण्यात येणार आहे. मात्र तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन रात्रीपासून इथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. मुंबई पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना नोटीसा बजावल्या आहेत.
चुनाभट्टी बीकेसी उड्डाणपूल आम्ही लोकार्पण करू या इशाऱ्यावर नवाब मलिक ठाम आहेत. उड्डाणपुलाचं उदघाटन जाणीवपूर्वक सरकार लांबवत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.