मुंबई : रिलायंस इंडस्ट्रीजचे चेयरमन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानीच्या साखरपुड्याचा भव्य सोहळा मुंबईत रंगला. बालमैत्रिण श्लोका मेहतासोबत आकाश अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकेल. या भव्य सोहळ्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावली. शाहरुख खान, प्रियंका चोप्रा, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांसारखे स्टार्स पार्टीत सहभागी झाले. पण या सोहळ्यात लक्षवेधी ठरला तो म्हणजे नीता अंबानींचा डान्स. मुलाच्या साखरपुड्यानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत नीता अंबानींनी बहारदार नृत्य सादर केले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील एंटीलिया बंगल्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील हे व्हिडिओज सोशल मीडियावरुन समोर आले आहेत. यात नीता अंबानींचा सुरेख डान्स पाहायला मिळतो. 
तर दुसऱ्या व्हिडिओत ईशा अंबानी भाऊ आकाश आणि वहीनी श्लोकाचे गुजराती रितीरिवाजांनुसार स्वागत करताना दिसते.



 


या कार्यक्रमात बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने बॉयफ्रेंड निक जोनाससोबत वर्णी लावली.



मार्चमध्ये आकाशच्या लग्नाची घोषणा करण्यात आली होती. श्लोका-आकाश स्कूल फ्रेंड्स असून डिसेंबरमध्ये यांचा विवाह होणार आहे. तर ३० जून म्हणजेच उद्या या दोघांचा साखरपूडा पार पडणार आहे.