मुंबई : निवडणुकीच्या आधी कुस्ती, आखाड्यावरुन महाराष्ट्रातल्या पैलवानांमध्ये जोरदार जुंपली होती. पण निकालाला आज चौदा दिवस उलटून गेले तरी खरा पैलवान कोण? याचं उत्तर अजूनही सापडलेलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेल लावून, षड्डू ठोकून गडी आखाड्यात उतरले खरे... खरा पैलवान कोण? हा सवाल करत मोठमोठ्या बतावण्याही झाल्या... पण निकाल लागल्याच्या चौदाव्या दिवशीही महाराष्ट्राचा आखाडा रिकामाच राहिलाय. एकही पैलवान सरकार स्थापन करतो, म्हणत षड्डू ठोकून पुढे आलेला नाही. 


मतदारराजानं निकालात अशी काही पाचर मारली की गेले १४ दिवस सगळ्याच पक्षाचे पैलवान फक्त तेल लावत बसलेत. महाराष्ट्राचा मातीचा आखाडा खऱ्या पैलवानाची वाट पाहतोय. कोण लावणार ठोकणार षड्डू? चला मैदान मोकळं आहे?