मोठी बातमी : ३ मे पर्यंत देशातील रेल्वे सेवा बंदच; मुंबई लोकलही यार्डात
Coronavirus कोरोना विषापाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीत देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी वाढवला
मुंबई : Coronavirus कोरोना विषापाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीत देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी वाढवला असल्याची घोषणा केली. परिणामी आणखी काही दिवसांसाठीसुद्धा देशातील बहुतांश सेवा या बंद राहणार आहेत. अगदी वाहतुकीच्या महत्त्वाच्या साधनांपैकी एक असणाऱ्या रेल्वेचाही यात समावेश आहे.
मध्य रेल्वेचे पीआरओ शिवाजी सुतार यांनी झी २४ तासला दिलेल्या माहितीत ही बाब स्पष्ट केली. येत्या काळात लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपेपर्यंत म्हणजेच ३ मे पर्यंत देशासह राज्यातही कोणत्याही प्रकारची रेल्वे वाहतूक होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या अंतर्गत मुंबई लोकलही पूर्णपणे बंद असणार आहे. त्यामुळे येत्या काळात रेल्वेसेवा सुरु होण्याच्या सर्व चर्चा आणि अफवांना आता पूर्णविराम लागला आहे.
देशभरात लॉकडाऊनची घोषणा पाहता सर्व रेल्वेसेवांनाही विराम लागला होता. जो आता आणखी काही काळासाठी वाढला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला उपनगरीय रेल्वे, मुंबई लोकल किंवा अन्य कोणत्याही प्रकारची रेल्वे वाहतूक सुरु होण्याचं चित्र नाही अशी अधिकृत माहिती समोर येत आहे.
वांद्रे स्थानकात घडलेल्या घटनेनंतर रेल्वे प्रशासनही सतर्क
काही दिवसांपूर्वीच मुंबईतील वांद्रे येथील रेल्वे स्थानकाबाहेर हजारो मजुरांची एकच गर्दी झाली होती. देशभरात लॉकडाऊन सुरु असतानाही इथे हजारोंच्या संख्येने मजुर एकत्र येऊन त्यांनी आपल्या राज्यांमध्ये परतण्यासाठी एक्स्प्रेस रेल्वे सोडण्याची मागणी केल्याचं म्हटलं गेलं. या मुद्द्या बरीच राजकीय वळणंही मिळआलीी. पण, परिस्थितीचं गांभार्य लक्षात घेत आता रेल्वेतकडूनच अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यात आली असून, सर्वांनाच याविषयी सतर्क करण्यात आलं आहे.