मुंबई : नोटाबंदीला पंधरा महिने उलटले तरी 500 आणि 1000च्या नेमक्या किती नोटा बँकेत परत आल्या आहेत, याची गणना अजूनही सुरूच असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय.  


गणना वेगानं करण्यासाठी यंत्र आयात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीत गणना वेगानं करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं 59 अत्याधुनिक यंत्र आयात केली आहेत. सध्या या यंत्रांच्या माध्यमातून प्रत्येक बँकेनं रिझर्व्ह बँकेत जमा केलेल्या नोटांचा हिशोब सुरू आहे. 


परत आलेल्या नोटांची किंमत 15.28 लाख कोटी


सध्या हे काम कुठे सुरू आहे, आणि होण्यास आणखी किती अवधी लागेल याचा तपशील मात्र देण्यात आलेला नाही. एप्रिल 2017 मध्ये रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या वार्षिक अहवाला, परत आलेल्या नोटांची किंमत 15.28 लाख कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलं. 


16 हजार 50 कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या नाहीत


8 नोव्हेंबर 2016च्या मध्यरात्री नोटाबंदी झाली. त्यावेळी चलनात असलेल्या पाचशे आणि हजाराच्या नोटांची किंमत 15.44 लाख रुपये होती. त्यामुळे जवळ जवळ 99 टक्के नोटा बँकांमध्ये परत आल्या असून  फक्त 16 हजार 50 कोटी रुपयांच्या नोटा बँकेत परत आलेल्या नसल्याचं पुढे आलंय.