मुंबई : भारतात कोरोना व्हायरसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाग्रस्तांमध्ये होणारी वाढ ही भारतासाठी मोठी चिंतेची बाब आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क, हँड सॅनिटायझर वापरणं, सतत हात धुणं अतिशय महत्त्वाचं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून मास्क आणि सॅनिटायझर सारख्या आवश्यक वस्तू इन हाउस तयार करण्यात येत आहेत. या मास्क आणि सॅनिटायझरचा वापर आरोग्य सेवा कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेत तैनात असलेल्या रेल्वे कर्मचार्‍यांना करता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण मध्य रेल्वेने 1,28,543 मास्क तयार केले आहेत. तर 7,118 लिटर हँड सॅनिटायझर तयार केलं आहे. 


पुणे विभागाकडून सर्वाधिक 33,435 आणि मुंबई विभागातून 1685 लिटर हँड सॅनिटायझर तयार करण्यात आलं आहे. 


माटुंगा आणि परळ येथील कार्यशाळेत 13 हजार 200 मास्क आणि 1600 लिटर सॅनिटायझर तयार करण्यात आलं आहे. तर एकूण मुंबई विभागातून 23672 मास्क आणि 1685 लिटर सॅनिटायझर तयार करण्यात आलं आहे.


नागपूर विभागातून 23986 मास्क आणि 1383 लिटर सॅनिटायझर तयार करण्यात आलंय. सोलापूर विभागातून 10250 मास्क आणि 500 लिटर सॅनिटायझर बनवण्यात आलं आहे.


वाचा - कोरोनावर मात केल्यानंतर भारत कसा असेल? पंतप्रधानांनी AEIOU शब्दांआधारे सांगितलं...


 


तर पुणे विभागातून 33435 सर्वाधिक मास्क आणि 1110 लिटर सॅनिटायझर तयार करण्यात आलं. भुसावळ विभागात 24000 मास्क तर 840 लिटर सॅनिटायझर तयार करण्यात आलं आहे.


वाचा - कोरोना व्हायरस वुहान प्रयोगशाळेत तयार झाला; नोबेल विजेत्या वैज्ञानिकाचा धक्कादायक दावा