दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार प्रचंड दुखावले गेले आहेत. पार्थ पवार हे लवकरच मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत आहेत, अशी माहिती पार्थ पवार यांच्या जवळच्या सूत्रांनी दिली आहे. पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत, त्यांच्या मताला काडीची किंमत नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी काल केलं होतं. यानंतर पार्थ पवार कमालीचे नाराज झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पार्थ पवार यांच्या या भूमिकेमुळे पवार कुटुंबियांमध्ये अद्याप काही आलबेल नसल्याचं समोर येत आहे. या वादावरुन काल रात्रीही शरद पवारांच्या मुंबईतल्या घरी बैठक झाली. या बैठकीला शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. पण या बैठकीनंतरही विषय मिटलेला नाही. या प्रकरणावर अजित पवार आणि पार्थ पवार यांनी मौन बाळगलं आहे. 


'राष्ट्रवादी'मध्ये बैठकांची मालिका, सुप्रिया सुळे मंत्रालयात अजित पवारांच्या भेटीला


पार्थ पवार यांचा मोठा निर्णय काय असणार? पार्थ राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार का? पार्थ दुसऱ्या पक्षात जाणार का राजकारणापासून अलिप्त राहणार? पार्थ पवार यांच्या निर्णयामुळे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढणार आहेत. तसंच पार्थ पवार यांनी मोठा निर्णय घ्यायचं ठरवलं तर अजित पवार काय भूमिका घेणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पवार कुटुंबासाठी मात्र हा मोठा धक्का असणार आहे. 


भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना परत आणण्यासाठी राष्ट्रवादीची व्यूहरचना