कोरोनामुळे मंत्रालयात सामान्यांना प्रवेशबंदी
मंत्रालयात पुरेशी तपास यंत्रणाच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे.
मुंबई: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारकडून मंत्रालयात सामान्य नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. मात्र, त्याचवेळी सचिव आणि मंत्र्यांकडे येणाऱ्या लोकांना कोणताही मज्जाव करण्यात आलेला नाही. त्यामुळे लोकांमध्ये सरकारच्या या अजब फतव्याविषयी चर्चा रंगली आहे.
प्रत्येक दिवशी मंत्र्यांकडे १० तर सचिवांना भेटायला येणाऱ्या पाच लोकांना मंत्रालयात प्रवेश देण्यात येईल. या हिेशेबाने दिवसभर साधारण हजारभर लोक मंत्रालयात येतील, असा अंदाज आहे. या लोकांची विमानतळावर होते तशी तपासणी होईल, असे प्रशासनानचे म्हणणे आहे. मात्र, मंत्रालयात पुरेशी तपास यंत्रणाच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय, मंत्रालयात दैनंदिन बैठकांचे आयोजन होणारच असल्याने केवळ सामान्यांना प्रवेश नाकारून काय साध्य होणार, असा सवाल विचारला जात आहे.
कोरोना इफेक्ट: सरकारी कार्यालयात बायोमेट्रिक प्रणालीचा वापर बंद
गेल्या आठवडाभरात देश आणि राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून खबरदारीचे उपाय योजले जात आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे ३८ रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी राज्यभरात कोरोनाचे पाच नवे रुग्ण आढळून आले. यापैकी यवताळमध्ये एक, मुंबईत तीन आणि नवी मुंबईतील एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यातील १० शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 'देऊळ' बंद
'सरकारी कार्यालयात येऊ नका, Whatsapp वरूनच काम करा'
राज्यभरात कोरोना झपाट्याने पसरत असल्याने नागरिकांनी सरकारी कार्यालयात येऊ नये, असे आवाहन नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. सरकारी कार्यालयात येण्याऐवजी Whatsapp वरूनच प्रलंबित कामांची माहिती घ्या, असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले आहे. याशिवाय, कोरोनाचा सामना करण्यासाठी नाशिकमध्ये लवकरच १५० ते २०० खाटांची व्यवस्था करू, असे त्यांनी सांगितले.