मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) सर्वेसर्वा राज ठाकरे ( Raj Thackeray)  यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय. तशी याचिका देखील मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलीय. ही याचिका हेमंत पाटील यांच्याद्वारे करण्यात आली आहे. हेमंत पाटील हे इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अध्यक्ष आहे. हेमंत पाटील (Hemant Patil) यांच्या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. गुढी पाडव्याच्या सभेनंतर राज ठाकरे यांनी धार्मिक स्थळावरील भोंग्याविरोधात भूमिका घेतली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या सभेत धार्मिकस्थळांवरील भोंग्याच्या विरोधात कठोर भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांनी ठाणे आणि औरंगाबाद या दोन्ही ठिकाणी सभा घेत आपली भूमिका आक्रमतेनं भाषणातून मांडली. 
मशिदीवरील भोंग्यातून होणारी अजान थांबवा; अन्यथा दुप्पट आवाजात मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजवू ही भूमिका घेण्यात आली होती. औरंगाबाद येथील सभेनंतर राज ठाकरे यांच्या विरोधात कमल 153, 116,117 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी त्यांचे वकील आर. एन. कछवे ( R. N. Kachave) यांच्यामार्फत कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेनुसार  राज ठाकरे यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसंच राज ठाकरे यांचे राजकीय दौरे, पत्रकार परिषदा आणि विविध शहरात कार्यक्रमानिमित्त होणाऱ्या दौऱ्यांवर काहीकाळापूरती बंदी घालण्याची मागणी करण्यात आलीय आहे.