मुंबई: दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. त्यामुळे दिल्लीतील हिंसाचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. ते रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी दिल्लीतील हिंसाचारावरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सरकारला अर्थव्यवस्थेपेक्षा राजकीय आणि सामाजिक अजेंडा पूर्ण करण्यातच अधिक रस'


केंद्रीय मंत्रीच 'गोली मारो' अशी चिथावणीखोर वक्तव्ये करतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दौऱ्यावर असताना दंगली पेटतात. समाजातील एका वर्गाला इतरांपासून तोडण्याचा प्रयत्न होतो. देशाच्या राजधानीला सध्या आग लागली आहे. विधानसभेत यश मिळाले नाही म्हणून दिल्लीत जातीय दंगली भडकावल्या जात आहेत. या माध्यमातून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका यावेळी शरद पवार यांनी केली. 


दिल्ली हिंसाचार : ताशेरे ओढणाऱ्या न्यायमूर्तींच्या बदलीनंतर राजकारण तापले



पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपच्या काही नेत्यांना आक्षेपार्ह वक्तव्ये करून तणाव वाढवण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधानांचे भाषण ऐकले तर लक्षात येते. देशाचे नेतृत्व करणारी व्यक्तीच धार्मिक वितंडवाद वाढवण्याचे वक्तव्य करते हे चिंताजनक आहे. सत्ता ही जनतेच्या रक्षणासाठी असते. मात्र, भाजपचे काही मंत्री 'गोली मारो' सारखी वक्तव्ये करून लोकांना चिथावण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक राज्यांमध्ये ध्रुवीकरणाचा माध्यमातून वातावरण बिघडवले जात आहे. अशा शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.