अनुदानासाठी शेतकऱ्यांना पीओएसने खत खरेदी बंधनकारक
राज्यातील शेतकऱ्यांना आता खत खरेदी करताना काळजी घ्यावी लागणार आहे, ही काळजी घेतली तर खताचे अनुदान शेतकऱ्यांना सहज मिळणे सोपे होणार आहे.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना आता खत खरेदी करताना काळजी घ्यावी लागणार आहे, ही काळजी घेतली तर खताचे अनुदान शेतकऱ्यांना सहज मिळणे सोपे होणार आहे.
खत खरेंदीसाठी किसान क्रेडीट कार्डने मिळालेलं एटीएम किंवा इतर एटीएम कार्ड जे शेतकऱ्यांच्या नावे असेल ते वापरता येणार आहे, तसेच खत विक्रेत्यांना पीओएस मशीन दिलं जाणार आहे. यामुळे कोणत्या शेतकऱ्यांने किती रूपयांचं खतं खरेदी केलं, याचं रेकॉ़र्ड ठेवणं सोप जाणार आहे.
पीओएसमशीन म्हणजे एकाप्रकारे स्वॅप मशीन, स्वॅप मारल्यानंतर तेवढ्या किंमतीच्या खरेदीवर शेतकऱ्यांना अनुदान देता येणार आहे.
शेतकऱ्यांना अनुदान मिळावं, म्हणून पीएसओ मशीनवर खत खरेदी करणे बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
यासाठी 20 हजार 988 अनुदानित खत वितरकांना पीओएस मशीनचे मोफत वाटप करण्यात येणार आहे, पुढील 3 दिवसात मशीनचे वाटप करण्यात येणार आहे.
अशा प्रकारे १ नोब्हेंबरपासून पीओएस मशिनद्वारे खत विक्री बंधनकारक होणार आहे.
खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना आधार क्रमांकही सक्तीचा करण्यात आला आहे. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी ही माहिती दिली आहे.
यासाठी 28 ते 30 ऑक्टोबर रोजी विशेष मोहिम राबवून खतांचा साठा ‘पीओएस’ मशीनमध्ये नोंदविला जाणार आहे.
राज्यात यासाठी तालुक्याच्या ठिकाणी वितरक मशीन घेऊन येणार असून नोंदीची मोहिम राबविली जाणार आहे.
राज्यातील 20 हजार 988 अनुदानित खत वितरक असून त्यांना प्रत्येकाला पीओएस मशीन मोफत वाटप करणार आहे.
महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे 60 लाख मेट्रीक टन अनुदानित खतांची विक्री होते.
खरीप हंगामात 33 लाख मेट्रीक टन आणि रब्बी हंगामात 27 लाख मेट्रीक टनाची उलाढाल होते.
खत खरेदीसाठी शेतकऱ्याने दुसऱ्या व्यक्तीस पाठवले तर त्याचाही आधारक्रमांक नोंदविण्यात येणार आहे.