आतिश भोईर, झी मीडिया, डोंबिवली: कोरोनाग्रस्त गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेसाठी तब्बल सहा तास प्रतीक्षा करावी लागल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. अखेर मनसे कार्यकर्त्यांनी प्रशासनावर दबाव टाकल्यानंतर या महिलेला रुग्णवाहिका मिळाली.डोंबिवलीत राहणाऱ्या या महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर महिलेच्या पतीने केडीएमसीच्या शास्त्रीनगर कोव्हीड रुग्णालयात रुग्णवाहिकेसाठी फोन केला. मात्र, आमच्याकडे रुग्णवाहिका नसून तुम्ही ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जा, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र, यानंतर प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नव्हती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कोरोनावर औषधच नाही, मग 'त्या' खासगी रुग्णालयात आठ लाखांचे बिल झालेच कसे?'


अखेर मनसे कार्यकर्त्यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी फोनाफोनी करून प्रशासनावर दबाव टाकला आणि महिलेला घ्यायला रुग्णवाहिका आली. यानंतर मनसे कार्यकर्ते ओम लोके आणि सागर मुळे हे दोघे या महिलेला ठाणे सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत सोडून आले. 


अरे देवा... राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ


दोनच दिवसांपूर्वी डोंबिवलीत रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने दोन किलोमीटर पायपीट करत रुग्णालय गाठल्याचा प्रकार समोर आला होता. तर कालच (शनिवारी) कल्याणमध्ये एका ७० वर्षांच्या आजोबांना चार मजले सरपटत उतरावे लागले होते. यानंतर रुग्णवाहिका चालक उपवास सोडायचं कारण देत निघून गेला होता. या सगळ्या निष्काळजीपणासाठी केडीएमसीचा भोंगळ कारभार कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.