मुंबई: कोरोनाच्या संकटकाळात मुंबईतील खासगी रुग्णालयांकडून सुरु असणाऱ्या लुटीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली. काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात महिलेला दाखल करण्यात आले होते. आठ दिवसांच्या उपचारानंतर शनिवारी या महिलेचा मृत्यू झाला. यानंतर संबंधित रुग्णालयाने नातेवाईकांच्या हातात आठ लाख रुपयांचे बिल ठेवले. मुळात कोरोनावर औषधच अस्तित्त्वात नसेल तर मग खासगी रुग्णालये अशाप्रकारे अव्वाच्या सव्वा दर कसा आकारु शकतात, असा सवाल रामदास आठवले यांनी उपस्थित केला. आठ दिवसांपूर्वी कोणतेही रुग्णालय या महिलेवर उपचार करायला तयार नव्हते. त्यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी तिला या रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी रुग्णालय प्रशासनाने त्यांना तीन लाख रुपये भरण्यास सांगितले. सरकारने असे प्रकार रोखले पाहिजेत, असे यावेळी आठवले यांनी म्हटले.
लोक मेल्यावर पाणी पाजायला येणार का? मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर शेलारांची टीका
तसेच आठवले यांनी राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे कोरोनाला रोखण्यात अपयश आल्याचीही टीकाही केली. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र राज्यात विशेषतः मुंबईत वाढत आहेत. मुंबईत वेगवान रुग्णसंख्या वाढत असताना महाविकास आघाडीचे सरकार केवळ आकडेवारीची कोरडी घोषणा करून जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करीत आहे. वास्तविक कोरोनाबधित रुग्णांना सरकरी आणि खाजगी कोणत्याही रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत, याकडे आठवले यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
कोरोनाबद्दलचा 'दिल्ली'चा अंदाज चुकवला, पण धोका कायम- मुख्यमंत्री
मुंबईत कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. या तुलनेत रुग्णालयांमध्ये कोरोना बधितांना उपचार मिळत नाहीत. रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नसल्याचे सांगत कोरोनाबाधित रूग्णांना रुग्णालयात दाखल करून घेतले जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. औषधोपचार योग्य मिळत नाही. मात्र, त्याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे जे केवळ वृत्तमध्यमांसमोर मोठया घोषणा करून जनतेच्या डोळ्यांत आश्वासनांची धूळफेक असल्याची टीका आठवले यांनी केली.