Raj Thackeray : मनसे अध्यक्षांना धमकीचा फोन, सुरक्षा वाढवण्याची मागणी
मनसे अध्य़क्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक असताना त्यांना धमकीचा फोन आला आहे.
मुंबई : मनसे अध्य़क्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना धमकीचा फोन आला आहे. राज ठाकरे यांना हिंदुत्व मुद्यांमुळे आता धमक्या येत आहेत. राज ठाकरे यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी केली आहे. (Threatening call to mns chief raj thackeray)
राज ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षेची आवश्यकता आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांना देखील सुरक्षा देण्यात यावी. अशी मागणी नांदगावकर यांनी केली आहे.
अनेक दिवसांपासून भोंग्याच्या विधानावरुन चर्चेत
मनसेप्रमुख गेल्या अनेक दिवसांपासून भोंग्याच्या विधानावरुन चर्चेत आहेत. गुढीपाडव्याला झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याची मागणी केली. यानंतर राज्यासह देशातील राजकारण ढवळून निघालं. या मागणीला देशातील विविध भागातून विशेष करुन हिंदुत्तवादी संघटनांनी समर्थन दर्शवलं आहे.
राज ठाकरे यांना उत्तर प्रदेश दौरा दरम्यान विशेष सुरक्षा पुरवली जाणार असल्याची माहिती याआधी सूत्रांनी दिली होती. उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार त्यांना सुरक्षा देणार आहे. राज ठाकरे हे 5 जूनला आयोद्धा दौऱ्यावर जाणार आहेत. राज ठाकरे यांना केंद्र सरकारकडून देखील सुरक्षा मिळण्याची शक्यता आहे.