`माझ्या हातात सत्ता द्या`, मराठा आरक्षणासंदर्भात राज ठाकरे काय म्हणाले?
`माझ्या हातात सत्ता द्या, एकही तरुण आणि तरुणी कामाशिवाय राहणार नाही`. राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे. वाचा सविस्तर
Raj Thackeray : महाराष्ट्राची अवस्था अशी करून ठेवली आहे. काल झाली ना सगळी भाषणं. उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेर येतच नाही. मात्र, उद्धव ठाकरे सारखे अब्दाली, अफजल खान असं बोलत असतात. सारखे वाघनख काढत असतात. महाराष्ट्राबद्दल काही तरी बोल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेकडून पुष्पा असा उल्लेख
तिकडे ते पुष्पा वेगळचं चालू आहे. एकनाथ शिंदे. मी आलेलो आहे. मी असा महाराष्ट्र पाहिला नाही कधी. कोणामुळे तुम्ही निवडून आला. आता काय करत आहात. आता राष्ट्रवादीमध्ये आहेत. पण तो उबाठाकडे तिकिट मागत आहे. कदाचित तो तुतारीकडे जाईल किंवा तुतारीकडून तो आपल्याकडे देखील येवू शकतो. मला कळत नाही की यांच्या घरचे यांना कशी साथ देतात.
शिवसेना, काँग्रेस फोडलीत, राज ठाकरेंचा शरद पवारांवर हल्लाबोल
शरद पवार सांगत आहेत की आमचा पक्ष फोडला. तुम्ही काय केलं आयुष्यभर. 1978 ला काँग्रेस फोडली. 1991 ला शिवसेना फोडली. त्यानंतर नारायण राणे यांना फोडलं. तुम्ही कसल्या फोडा फोडीच्या गोष्टी बोलत आहात.
अजितदादा भाजपसोबत येण्याआधी मोदींचा राष्ट्रवादीवर आरोप
अजित पवार यांना गुलाबी जॉकेट घालायला कोणी सांगितले आहे मला माहिती नाही. भारतीय जनता पक्ष या लोकांना घेतो तरी कसा. अजित पवार भाजपमध्ये येण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की 70 हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना आम्ही जेलमध्ये टाकू. मग जेलमध्ये टाकण्याआधी तुम्ही त्यांना मंत्रीमंडळात टाकले.
'त्यानंतर लाडक्या बहिणीचे पैसे येणार नाहीत'
आज ती लाडकी बहीण योजना काढली. पैसे देत आहेत. कोणी मागितले होते पैसे. आज तुम्हाला लिहून देतो या लाडक्या बहीण योजनेचे पैसे काही दिवसच येतील. त्यानंतर लाडक्या बहिणीचे पैसे येणार नाहीत. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये अशी परिस्थिती येईल या सरकारकडे पगार देण्यासाठी पैसे नसतील. महिलांना पैसे नको सक्षम बनवा. त्यांच्या हाताला काम द्या. कामातून पैसे उभा करतील. महाराष्ट्रातील महिला सक्षम आहेत. त्यांना मार्ग दाखवा. फुकट कसले पैसे देताय.
मराठा आरक्षणावर काय म्हणाले राज ठाकरे?
मराठवाड्यामध्ये दौऱ्यासाठी गेलो होतो. तिथे काही मराठा बांधव मला भेटायला आले. मराठा समाजाला आरक्षण द्या. मी म्हटलं माझी भूमिका तुम्हाला सांगितली होती. जे मी पूर्ण करू शकतो त्याचा मी शब्द देतो. माझ्या हातात सत्ता देऊन बघा. महाराष्ट्रातील तरुण-तरुणी कामाशिवाय राहणार नाही. प्रत्येकाच्या हातामध्ये काम असेल. पण ते जातीप्रमाणे दिले जाणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. ते होऊ शकत नाही. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. हे खरं बोलण्याचं धाडस फक्त राज ठाकरे करू शकतो. त्यामुळेच मी लोकांना परवडत नसेल.