मुंबई :  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सायबर सिक्युरिटीशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पंजाब आणि सिंध बँकेला (Punjab and Sind Bank) 25 लाखांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयच्यानुसार, बँकेने सायबर सुरक्षांच्या निकषांचे पालन केले नाही. या सरकारी मालकीच्या बँकेला 16 मे आणि 20 मे 2020 रोजी काही सायबर घटनांबद्दल माहिती देण्यात आली होती, परंतु त्याकडे बँकेने दुर्लक्ष केलं. त्यामुळे आरबीआयने ही दंडात्मक कारवाई केली. यासंदर्भात बँकेला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली. (RBI fined 2 banks for violating the rules related to cyber security)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरबीआयच्या कारणे दाखवा नोटीसीवर बँकेकडून उत्तर देण्यात आले. पण आरबीआयला ते समाधानकारक वाटले नाही. आरबीआयने म्हटलं की, “वरील घटनेचा अहवाल आणि घटनांच्या फॉरेन्सिक विश्लेषण अहवालात असे दिसून आले आहे की बँकेने पूर्वी दिलेल्या सूचनांचे पालन केले नाही. कारणे दाखल्याच्या नोटिसला उत्तर म्हणून बँकेने दिलेली स्पष्टीकरण आणि कागदपत्रे पुरेशी नव्हती. तपासणीनंतर असे दिसून आले की तेथे सूचनांचे उल्लंघन झाले आहे, त्यामुळे आर्थिक दंडांचा बडगा उगारण्यात आला".


या बँकेवरही दंडात्मक कारवाई


मालमत्तेचे वर्गीकरण, तरतूद, यूसीबी इत्यादी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरबीआयनेही इटावाच्या नगरपालिका सहकारी बँक विरूद्ध कारवाई केली आहे.  त्यामुळे  बँकेला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने सांगितले की, दोन्ही प्रकरणांमध्ये  अनियमिततेमुळे हा दंड आकारण्यात आला आहे.


PMC बॅंकेवरील निर्बंधात वाढ


आरबीआयने शुक्रवारी पीएमसी बँकेच्या निर्बंधात 31 डिसेंबर 2021  पर्यंत वाढ केली आहे. हे निर्बंध आधी 1 जुलैपर्यंत होते. आरबीआयने सांगितलं की पीएमसी बँकेच्या पुनर्रचना पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन हे निर्बंध वाढवण्यात आले आहेत.  
 
संबंधित बातम्या : 


आरबीआयची मोठी कारवाई, नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल या चार बँकांना मोठा दंड