मुंबई : महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला आहे.  रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (Reserve Bank Of India) अर्थात आरबीआयनं रेपो रेटमध्ये (Repo Rate) महिन्याभरात जवळपास दुसऱ्यांदा वाढ केली आहे. आरबीआयने यावेळेस रेपो दरात अर्धा टक्क्यानं वाढ केली आहे. त्यामुळे आता याचा थेट परिणाम कर्जाच्या हफ्त्यावर होणार आहे. (reserve bank of india raises repo rate by 0 50 per cent  house and car emi will increase)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरबीआयने .50 टक्क्याने रेपो रेटच्या दरात वाढ केली. त्यामुळे आता रेपो दर हा 4.40 वरुन 4.90 इतका झाला आहे. रेपो दर वाढवल्याचा थेट परिणाम हा कर्जाच्या ईएमआयवर होणार आहे. यामुळे नवीन कर्जे तर महागतीलच. सोबतच  अनेक जुन्या कर्जांचे विशेषत: गृहकर्ज (Home Loan) आणि वैयक्तिक कर्जाचे (Personal Loan) हप्ते वाढतील. याआधी आरबीआयने मेमध्ये  रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली होती. तेव्हा रेपो दर हा 4.40 टक्के झाला होता.  


यूपीआय यूझर्ससाठी मोठी घोषणा


युपीआयला क्रेडीट कार्ड लिंक करता येणार. यापुढे यूपीआयवरून क्रेडीट कार्ड पेमेंट्स करता येणार.  पतधोरण आढावा जाहीर करताना आरबीआयने मोठ्या घोषणा केल्या आहेत. यूपीआय क्रेडीट कार्ड लिंकींगसह ग्रामीण भागासाठी एक मोठी घोषणा करण्यात आलीय. 


नागरी सहकारी बँकांच्या गृहकर्जांची मर्यादा 100 टक्के करण्यात आलीये. आजवर घराच्या रक्कमेच्या 75 ते 80 टक्केच कर्ज देता येत होतं. मात्र आता घराची संपूर्ण रक्कम कर्ज घेता येणार असल्यानं त्याचा लाखो ग्राहकांना लाभ होणार आहे.