मुंबई : येथील केईएम रुग्णालयात धक्कादायक घटना पुढे आली आहे. निवासी डॉ. प्रणय जैस्वाल (२८) यांनी आत्महत्या केली. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याबाबत भोईवाडा पोलिसांकडून तपास सुरु आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. प्रणय जैस्वाल हे केईएम रुग्णालयातून नुकतीच पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यांना सुवर्ण पदक (Gold medal) मिळाले होते. ते मूळचे अमरावतीचे राहणारे होते. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अधिक तपास भोईवाडा पोलिसांकडून सुरु आहे.